नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या आफ्रिकेविरूद्धच्या दमदार विजयामुळे टीम इंडियाचे क्रिकेटपटू खुष आहेत. मात्र, संघातील एका खेळाडूच्या आनंदात अजून भर पडली आहे. भारतीय कसोटी संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धीमान साहा परत एकदा बाप होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
हेही वाचा -अंबानींच्या घरी दिवाळी सेलिब्रेशन... क्रिकेटपटूंनी लगावले चार चांद
वृद्धीमान साहानं त्याच्या ३५ वाढदिवशी ही आनंदाची वार्ता चाहत्यांना कळवली. त्याने ट्विटरद्वारे पत्नी आणि मुलीसह एक फोटो शेअर केला. 'हा वाढदिवस खुप खास आहे. नव्या सदस्याच्या स्वागतासाठी आम्ही सर्व आतुर आहोत. आमच्याकडे आणखी एक पाहुणा येणार आहे. तुमचा आशीर्वाद पाठिशी असू द्या', असे साहानं या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
दुखापतीमुळे वृद्धिमान साहा भारतीय संघाबाहेर होता. त्याने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध अखेरची कसोटी मालिका खेळली होती. त्यामुळे तब्बल २२ महिन्यानंतर साहानं कसोटीत पुनरागमन केले.