महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कसोटी अजिंक्यपद : पाकिस्तानने गुणांचे खाते उघडले, ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत - कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

पाकिस्तान-श्रीलंका सामना अनिर्णीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी २० गुण देण्यात आले. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने ४० गुणांची कमाई केली.

world test championship : pakistan opens their accoun in points table australia strong position
कसोटी अजिंक्यपद : पाकिस्तानने गुणांचे खाते उघडले, ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

By

Published : Dec 16, 2019, 4:56 PM IST

दुबई - रविवारी दोन कसोटी सामन्यांचे निकाल लागले. पावसामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. तर दुसरीकडे पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना यजमान ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशीच २९६ धावांनी जिंकला. या सामन्यानंतर जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या गुणातालिकेत बदल झाला आहे.

पाकिस्तान-श्रीलंका सामना अनिर्णीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी २० गुण देण्यात आले. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने ४० गुणांची कमाई केली.

जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या गुणातालिकेत भारतीय संघ ३६० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया ८ सामन्यात २१६ धावांची कमाई करत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

न्यूझीलंडच्या ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर क्रमवारीत एक स्थानाचे नुकसान झाले आहे. सध्या न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे. तर ८० गुणांसह तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेच्या संघाने उडी घेतली आहे.

दरम्यान, पाकिस्तान संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणातालिकेत खाते उघडले आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना अनिर्णीत ठरल्याने पाकला २० गुण मिळाले असून ते सहाव्या स्थानावर आहेत. वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अद्याप गुणाचे खाता उघडलेले नाही.

हेही वाचा -पाकच्या आबिद अलीचा विश्वविक्रम, एकदिवसीयनंतर पदार्पणाच्या कसोटीत ठोकलं शतक

हेही वाचा -AUS Vs NZ : स्टार्कचे ९ बळी, डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर मोठा विजय

हेही वाचा -पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतावर ८ गडी राखून विजय

ABOUT THE AUTHOR

...view details