महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बॉउंसर जबड्यावर आदळला, पाण्यासारखं रक्त वाहिल...संघहितासाठी अॅलेक्स केरी पुन्हा उतरला मैदानात - semifinal

विश्वकरंडकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील आठव्या शतकात जोप्रा आर्चरच्या वेगवान चेंडू केरीच्या जबड्यावर आदळला आणि केरीला गंभीर दुखापत झाली. आर्चरचा चेंडू इतका वेगवान होता की, केरीच्या जबड्यावरिल कातडी सोलली गेली आणि त्यातून रक्त वाहू लागले. हे पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

अॅलेक्स केरीच्या जबड्यावर चेंडू आदळला; पट्टी बांधून केरीने केली खेळी

By

Published : Jul 11, 2019, 6:08 PM IST

Updated : Jul 11, 2019, 7:51 PM IST

बर्मिंगहॅम- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेती दुसरा उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने इंग्लडविरुध्द प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय ऑस्ट्रेलियाला महागात पडला. ६.१ षटकात ३ बाद १४ अशी अवस्था ऑस्ट्रेलियाची झाली. तेव्हा अॅलेक्स केरी मैदानात आला. स्मिथ आणि केरीची जोडी मैदानात होती. तेव्हा आठव्या शतकात जोप्रा आर्चरच्या वेगवान चेंडू केरीच्या जबड्यावर आदळला आणि केरीला गंभीर दुखापत झाली. आर्चरचा चेंडू इतका वेगवान होता की, केरीच्या जबड्यावरिल कातडी सोलली गेली आणि त्यातून रक्त वाहू लागले. हे पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

अॅलेक्स केरीच्या जबड्यावर चेंडू आदळला तो क्षण....

तेव्हा तातडीने मैदानात वैद्यकीय मदत मागवण्यात आली. इकडे केरी जखमी झालेला पाहून ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. संघाला आपली गरज आहे हे ओळखून केरीने जबड्यावर पट्टी बांधली आणि मैदानात पुन्हा खेळायला सुरूवात केली. शेवटी ४६ धावांवर असताना आदिल रशिदच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक व्हीन्सने त्याचा झेल घेत केरीची संघर्षपूर्ण खेळीला पूर्णविराम दिला.

अॅलेक्स केरीच्या जबड्यावर आदळला बॉउंसर; संघहितासाठी पुन्हा उतरला मैदानात
Last Updated : Jul 11, 2019, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details