महाराष्ट्र

maharashtra

ICC WC २०१९ : विराट कोहलीला दंड; अनावश्यक अपील केल्याने आयसीसीची कारवाई

By

Published : Jun 23, 2019, 4:31 PM IST

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये काल शनिवारी झालेल्या भारत विरुध्द अफगाणिस्तान सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या नियमावलीचा भंग केल्याचे दिसून आले. या कारणाने आयसीसीने कोहलीला सामन्याच्या मानधनापैकी २५ टक्के रक्कम दंड म्हणून आकारला आहे.

ICC WC २०१९ : विराट कोहलीला दंड; अनावश्यक अपील केल्याने आयसीसीची कारवाई

दुबई- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये काल शनिवारी झालेल्या भारत विरुध्द अफगाणिस्तान सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या नियमावलीचा भंग केल्याचे दिसून आले. या कारणाने आयसीसीने कोहलीला सामन्याच्या मानधनापैकी २५टक्के रक्कम दंड म्हणून आकारला आहे. आयसीसीने आज रविवारी याची माहिती दिली.

आयसीसीच्या म्हणण्यानुसार, कोहलीने अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात २९ षटकात पंच आलम दार यांच्याजवळ जाऊन चुकीच्या पध्दतीने आक्रमकपणे 'अपील' केले. यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कोहलीने आपल्या चुक मान्य केली असून दंडही भरण्यासाठी तयार झाला आहे. या कारणाने या प्रकरणात पुढील कारवाई होणार नाही.

दरम्यान, भारताने अफगाणिस्तान विरुध्दचा सामना ११ धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने हॅट्रीक विकेट घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details