सिडनी- आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लढत होणार आहे. या लढतीआधीच इंग्लंडची कर्णधार हिथर नाइट हिला एका भारतीय खेळाडूची भिती वाटू लागली आहे. तिने 'त्या' खेळाडूचा आम्हाला धोका असल्याची कबुली दिली आहे. नाइटच्या हृदयाची ठोके वाढवणारी पूनम यादव आहे.
उपांत्य सामन्याआधी पत्रकार परिषदेत बोलताना नाइट म्हणाली की, 'भारताविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर आम्हाला त्यांच्या फिरकीपटूंचा यशस्वी सामना करावा लागणार आहे. भारतीय संघात फिरकीपटू पूनम यादव ही सर्वात धोकादायक खेळाडू आहे.'
पूनमच्या गोलंदाजीचा अभ्यास केला असून आम्ही मागील विश्वकरंडकप्रमाणे पूनमचा निट सामना करू, असेही नाइट म्हणाली.