पोर्ट ऑफ स्पेन - भारत-वेस्ट इंडीज महिला संघातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने २-१ ने बाजी मारली. मराठमोळ्या स्मृती मानधनाच्या अर्धशतकी खेळीने भारतीय महिला संघाने अखेरचा सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला. स्मृती मंधानाला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.
अखेरच्या सामन्यात यजमान वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विडींज कर्णधार स्टेफनीचा हा निर्णय अंगलट आला. विडींजचा निम्मा संघ १०० धावांच्या आत माघारी परतला. तेव्हा कर्णधार स्टेफनी टेलरने (७९) अर्धशतकी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्याला स्टेसी किंगने ३८ धावा काढत चांगली साथ दिली. दोघांमुळे विडींजचा संघ १९४ धावांपर्यंत पोहोचला. भारताकडून झुलन गोस्वामी आणि पुनम यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.