दुबई - महिला क्रिकेट विश्वासाठी एक आनंदायी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) महिला क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेच्या बक्षिस रक्कमेत भरघोस वाढ केली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले असून २०२१ च्या विश्वविजेत्या संघाला वाढीव रक्कम मिळणार आहे.
पूर्वी महिला विश्वकरंडक स्पर्धा जिंकल्यानंतर विजेत्या संघाला १४ कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळत होते. मात्र, आता आयसीसीने यामध्ये १० करोड रुपयांची वाढ दिली आहे. यामुळे २०२१ च्या विश्वविजेत्या संघाला २४ कोटी रुपये मिळणार आहेत.