नवी दिल्ली - भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघातील ३ सामन्याची मालिका भारताने ३-० ने जिंकली. या मालिकेतील अखेरचा रोमांचक सामना भारताने ६ धावांनी जिंकला. भारतीय खेळाडू एकता बिष्टने या सामन्यात विचित्र झेल घेतला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत आफ्रिकेसमोर १४६ धावांचे माफक आव्हान दिले होते. तेव्हा आफ्रिकेचा संघ एकावेळेस मजबूत स्थितीत दिसत होता. अशा स्थितीत भारतीय कर्णधार मिताली राजने आपली स्टार फिरकी गोलंदाज एकता बिष्टच्या हाती चेंडू सोपवला. एकताने आपल्या चौथ्या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या नोडूमिसो शानघासेचा विचित्र झेल घेत बाद केले.
नोडूमिसो जोरदार स्ट्रेट शॉट लगावला. नोडूमिसोच्या फलंदाजीमधून निघालेला जबरदस्त शॉटला अडवणे कठीण होते. मात्र एकताच्या हाताला चेंडू लागला आणि चेंडू उडत मिड ऑफमध्ये उभ्या असलेल्या मानसी जोशीच्या दिशेने गेला आणि मानसीने तो झेल झेलला.