दुबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आज आपला ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. तो आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी युएईत आहे. यंदाचा बर्थ डे विराटसाठी खूपच खास आहे. कारण त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती आहे. तिने पतीचा बर्थ डे दणक्यात साजरा केला. या बर्थ डे पार्टीचा व्हिडिओ सद्या व्हायरल झाला आहे. यात विराट रोमँटिक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यासाठी विराट, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसंघासोबत युएईत आहे. विराटसोबत अनुष्का शर्माही आहे. तिने विराटचा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे. अनुष्काच्या या सप्राईज पार्टीने विराटही रोमँटिक झाला आणि त्याने रोमँटिक अंदाजात पत्नीचे आभार मानले. या पार्टीला बंगळुरू संघातील खेळाडू आणि स्टाप उपस्थित होता.
दरम्यान, विराटच्या वाढदिवसाच्या पार्टीत बंगळुरूचा युजवेंद्र चहल तिची होणारी पत्नी धनश्री वर्मासोबत सहभागी झाला होता. पार्टीत त्याने अनुष्का विराट यांच्यासह फोटो काढले. हे फोटोदेखील सद्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.
विराटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी -