मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात विडींजचा 'हा' गोलंदाज होणार दाखल - Adam Milne
जोसेफ संघात दाखल झाल्यानंतर वेगवान गोलंदाजी अधिक मजबूत होण्याची मुंबईला आशा
![मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात विडींजचा 'हा' गोलंदाज होणार दाखल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2827668-984-7423ba83-4e38-457e-be0b-4346f1ea9da5.jpg)
Alzarri Joseph
मुंबई - विडींजचा गोलंदाज अल्झारी जोसेफ मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार आहे. दुखापतग्रस्त झालेल्या अॅडम मिल्नेच्या जागी अल्झारी जोसेफला मुंबईच्या संघात पाचारण करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मुंबईने आपल्या अधिकृत ट्विटरवरुन दिली आहे.
विडींजसाठी अल्झारी जोसेफने ९ कसोटी सामने खेळताना २५ तर १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४ विकेट घेतले आहेत. जोसेफ संघात दाखल झाल्यानंतर वेगवान गोलंदाजी अधिक मजबूत होण्याची आशा मुंबईच्या संघाला असेल.
आयपीएलमध्ये आज बंगळूरु आणि मुंबई यांच्यात लढत होणार. या मोसमातील हा मुंबईचा दुसरा सामना असून पहिल्या सामन्यात मुंबईला दिल्लीकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
असा आहे मुंबई इंडियन्स संघ
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमरा, राहुल चहर, बेन कटिंग, पंकज जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सिद्धेश लाड, एव्हिन लुईस, लसिथ मलिंगा, मयंक मार्कंडे, मिचेल मॅक्क्लिनॅघन, अल्झारी जोसेफ, हार्दिक पंडय़ा, किरॉन पोलार्ड, अनुकूल रॉय, रसिक सलाम, युवराज सिंग, अनमोलप्रीत सिंग, बिरदर शरण, आदित्य तरे, जयंत यादव, सूर्यकुमार यादव.