कोलकाता - बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) वेस्ट इंडीजचे माजी फलंदाज एव्हर्टन वीक्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ईडन गार्डन स्टेडियममध्ये बांधल्या जाणाऱ्या संग्रहालयात वीक्स यांना जागा मिळेल, अशी सीएबीने घोषणा केली. वेस्ट इंडीज किक्रेटमधील महान फलंदाज म्हणून ओळखले जाणारे सर एवर्टन वीक्स यांचे बुधवारी वयाच्या 95 व्या वर्षी बार्बाडोसमध्ये निधन झाले.
कॅबचे अध्यक्ष अभिषेक दालमिया म्हणाले, "क्रिकेटमध्ये वीक्स हे एक मोठे नाव होते. त्यांची उणीव संपूर्ण क्रीडा जगाला जाणवेल. विशेषत: स्वतंत्र भारताच्या ईडन गार्डनमध्ये त्यांनी झळकावलेले पहिले शतक आमच्या लक्षात राहतील. येथील क्रिकेट संग्रहालयात त्याच्या नावाला कायमस्वरुपी स्थान देण्यात येईल, असा आम्ही निर्णय घेतला आहे. कोरोनाव्हायरसचा प्रभाव कमी झाल्यावर संग्रहालयाचे काम सुरू होईल.''