किंग्स्टन - वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज ओशने थॉमस रविवारी कार अपघातात जखमी झाला. सेंट कॅथरीनमधील ओल्ड हार्बर येथे हायवे २००० जवळ थॉमसच्या गाडीला अपघात झाला. त्यानंतर, थॉमसला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. वेस्ट इंडीज प्लेयर्स असोसिएशनने (डब्ल्यूआयपीए) या अपघाताची माहिती दिली.
राजस्थान रॉयल्सचा खेळाडू कार अपघातात जखमी - ओशाने थॉमस कार अपघात न्यूज
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ओशने थॉमसच्या गाडीला अपघात झाला. गेल्या महिन्यात थॉमसने आयर्लंडविरुद्ध विंडीजकडून अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.
![राजस्थान रॉयल्सचा खेळाडू कार अपघातात जखमी windies cricketer Oshane Thomas injured in car accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6116771-thumbnail-3x2-fff.jpg)
राजस्थान रॉयल्सचा खेळाडू कार अपघातात जखमी
हेही वाचा -"विराटसारख्या खेळाडूंना बाद करण्यासाठी मी खेळतो"
उपचारानंतर थॉमसला घरी पाठवण्यात आल्याचे थॉमसच्या एजंटने सांगितले आहे. गेल्या महिन्यात थॉमसने आयर्लंडविरुद्ध विंडीजकडून अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. मार्चमध्ये सुरू होणार्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे.