नेपियर - न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनला न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने यंदाच्या वर्षातील सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून घोषित केले. त्याचसोबत रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन मुनरो यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. न्यूझीलंड संघाच्या तिन्ही प्रकाराच्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या केन विलियमसन यास वर्षातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून 'रिचर्ड हेडली' किताब देऊन गौरविण्यात आले. तसेच त्याला टेस्ट प्लेयर ऑफ द इयरचा किताबानेही सन्मानित करण्यात आले.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन 'रिचर्ड हेडली' किताबाने सन्मानित - कर्णधार केन विलियमसन
रॉस टेलर या वर्षातील सर्वश्रेष्ठ एकदिवसीय खेळाडू म्हणून तर कुलिन मुनरो यास टी-२० मधील सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
केन विलियमसन
रॉस टेलर या वर्षातील सर्वश्रेष्ठ एकदिवसीय खेळाडू म्हणून तर कुलिन मुनरो यास टी-२० मधील सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. महिला क्रिकेटरमध्ये अष्टपैलू एमेलिया केर हिचा सन्मान करण्यात आला. तिने मागील वर्षी डबलिन येथे आयर्लंडकडून खेळाताना २३२ धावांची खेळी केली होती. तसेच १७ धावांत ५ गडी बाद केले.
कार्यक्रमापूर्वी मागील आठवड्यात क्राइस्टचर्च येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. या हल्ल्यात ५० लोक मेले होते.