मुंबई -रणजी स्पर्धेच्या इतिहासात मुंबईचा संघ 'मातब्बर' अशा विशेषणाने ओळखला जातो. मात्र, प्रतिष्ठित अशा या स्पर्धेतील यंदाच्या हंगामात मुंबईचा संघ ढेपाळलेला दिसून आला. पहिल्या सामन्यात रेल्वेने, तर दुसऱ्या सामन्यात कर्नाटकने मुंबईचा फडशा पाडला. त्यामुळे ११ जानेवारीला तामिळनाडूविरूद्ध होणाऱ्या सामन्यात मुंबईचा संघ कसा खेळतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
हेही वाचा -काय सांगता!..विराटनं घेतली पहिलीच धाव अन् घडला मोठा विश्वविक्रम
या आगामी सामन्यासाठी मुंबईच्या संघात महत्वाचे बदल झाले आहेत. फॉर्मात असलेला सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असून त्याच्या जागेवर आदित्य तरे मुंबईचे नेतृत्व करणार आहे. पृथ्वी शॉ आधीच जायबंदी झाल्याने त्याची कमतरता संघाला नक्की भासेल. अजिंक्य रहाणेही न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असल्यामुळे त्यालाही रणजी सामन्यात खेळता येणार नाही.
मुंबईचा संघ -
आदित्य तरे (कर्णधार), सिद्धेश लाड, जय बिस्ता, आकिब कुरेशी, हार्दिक तामोरे, शुभम रांजणे, आकाश पारकर, सर्फराज खान, शम्स मुलाणी, विनायक भोईर, शशांक अतार्डे, दिपक शेट्टी, तुषार देशपांडे, भुपेन ललवानी, रोस्टन डायस.