एंटिगा - फिरकीपटूंच्या जोरावर श्रीलंकेने वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा टी-२० सामना ४३ धावांनी जिंकला आणि तीन सामन्याच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.
श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडीजचा संघ १८.४ षटकात ११७ धावावर ऑलआऊट झाला. वानिंदुदु हसरंगा, अकिला धनंजय, धनुष्क गुणतिलका आणि लक्षण संदाकन या फिरकीपटूंनी विंडीजचे ९ गडी बाद करत यजमान संघाचे कंबरडे मोडले.
स्लो पीचवर फिरकीपटूंना संघात खेळवण्याचा श्रीलंकेचा निर्णय योग्य ठरला. वेस्ट इंडीजचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. यामुळे त्यांचा पराभव झाला. पहिल्या टी-२० सामन्यात हॅट्ट्रिक आणि एका षटकात ६ षटकार देणारा श्रीलंकन गोलंदाज धनंजयने चार षटकात १३ धावा देत १ गडी टिपला.
हेही वाचा -सुंदरला शतकाची हुलकावणी : वाईट वाटतं रे..! लक्ष्मणने व्यक्त केली खंत
हेही वाचा -भारत वि. इंग्लंड : भारताचा पहिला डाव संपुष्टात, सुंदरचे शतक हुकले