मॅँचेस्टर -कोरोनानंतर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी मालिकेचा अखेरचा सामना आज ओल्ड ट्रॅफर्टवर सुरू झाला आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज विरूद्धच्या या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे या तिसऱ्या कसोटीत कोण वर्चस्व राखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू हे लाल टोपी आणि लाल रंगाची छटा असलेली जर्सी घालून मैदानात उतरले आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रू स्ट्रॉसची पत्नी रुथच्या स्मरणार्थ दोन्ही संघांनी हा निर्णय घेतला आहे.