नवी दिल्ली - पाकिस्तानची माजी क्रिकेटपटू मरिना इक्बाल हिच्या 'हिल्स'वरून (heels) एक वाद निर्माण झाला. लाहोरच्या क्रीडा पत्रकाराने हा वाद निर्माण केला. मात्र, या प्रकरणात काहीच तथ्य नसल्याचे उघड झाले. क्रीडा पत्रकार कादिर ख्वाजाने नॅशनल टी-२० चषक स्पर्धेच्या सामन्याआधी एका चॅट शोमध्ये मारिनाचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोमध्ये तिने हिल्स घातल्याचे सांगण्यात आले.
पाकिस्तानी क्रिकेटपटूचे क्रीडा पत्रकाराला सणसणीत उत्तर - pak cricketer troll latest news
पाकिस्तानची माजी क्रिकेटपटू मरिना इक्बाल ही खेळपट्टीवर हिल्स घालून समालोचन करत होती, असे क्रीडा पत्रकार कादिर ख्वाजाने सांगितले.
खेळपट्टीवर हिल्स घालून मरिना या कार्यक्रमात होती, असे या फोटोवरून दाखवण्यात आले. मात्र, या फोटोत तिचे पाय दिसत नव्हते. ''खेळपट्टीजवळ हिल्स घालणे, बरोबर आहे का? तुमची याबद्दल प्रतिक्रिया हवी आहे", असे कादिर ख्वाजाने ट्विटरवर लिहिले.
समालोचन करत असताना मरिनाने हे ट्विट पाहून लगेच उत्तर दिले. "अर्ध्या ज्ञानामुळे धोका निर्माण होऊ शकतो कादिर. मी खेळपट्टीवर हिल्स घातलेली नाही. मी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. मला प्रोटोकॉल माहीत आहेत", असे मरिनाने उत्तर दिले. त्यानंतर ख्वाजाने प्रतिक्रिया दिल्ल्याबद्दल मरिनाचे आभार मानले आहेत.