महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs WI ३rd ODI - नाणेफेक जिंकून विंडीजचा फलंदाजीचा निर्णय, भारताला मालिका विजयाची संधी - Playing XI

आजचा सामना हा क्विन्स पार्कच्या ओवल मैदानावर होत आहे.

IND vs WI ३rd ODI - नाणेफेक जिंकून विंडीजचा फलंदाजीचा निर्णय

By

Published : Aug 14, 2019, 7:28 PM IST

Updated : Aug 14, 2019, 7:59 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन -टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज या संघात आज शेवटचा एकदिवसीय सामना होत आहे. यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना हा क्विन्स पार्कच्या ओवल मैदानावर होत आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आघाडी घेतलेल्या भारतीय संघासमोर आज मालिका विजयाची संधी असणार आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाने कुलदीप यादवला विश्रांती देत युजवेंद्र चहलला संघात स्थान दिले आहे.

तर दुसरीकडे वेस्ट इंडीजने आजच्या सामन्यासाठी दोन बदल केले आहेत. सॅल्ल्यूटकिंग शेल्डन कॉट्रेल ऐवजी आज किमो पॉलला आणि ओशान थॉमस ऐवजी फॅबियन ऍलेनला 11 जणांच्या संघात स्थान मिळाले आहे.

दोन्ही संघांची Playing XI -

  • भारत - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, खलील अहमद, युजवेंद्र चहल
  • वेस्ट इंडीज - जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, एविन लुईस, शाई होप, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, रोस्टन चेज, कीमो पॉल, कार्लोस ब्रेथवेट, केमार रोच, फाबियान अॅलन
Last Updated : Aug 14, 2019, 7:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details