महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शेफाली आणि स्मृतीनं विंडीजला धुतलं, भारताचा दणदणीत विजय - भारत विरुध्द वेस्ट इंडीज

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ४ बाद १८५ धावा केल्या. शेफाली वर्माने ४९ चेंडूत ७३ धावांची तुफानी खेळी केली. त्यात तिने ६ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार ठोकले. शेफालीला मराठमोळी स्मृती मानधनाची साथ लाभली.

Women Cricket : १५ वर्षीय शेफालीची आक्रमक खेळी, भारताचा वेस्ट इंडीजवर विजय

By

Published : Nov 10, 2019, 11:45 AM IST

Updated : Nov 10, 2019, 11:59 AM IST

पोर्ट ऑफ स्पेन - वेस्ट इंडीजच्या महिला संघाला एकदिवसीय मालिकेत धूळ चारल्यानंतर भारतीय महिला संघाने टी-२० मालिकेची सुरूवात विजयाने केली. १५ वर्षीय सलामीवीर शेफाली वर्माच्या तुफानी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर, भारताने पहिला टी-२० सामना ८४ धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघाने ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

शेफाली वर्मा स्मृती मानधनासोबत धाव घेताना...

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ४ बाद १८५ धावा केल्या. शेफाली वर्माने ४९ चेंडूत ७३ धावांची तुफानी खेळी केली. त्यात तिने ६ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार ठोकले. शेफालीला मराठमोळी स्मृती मानधनाची साथ लाभली. स्मृतीने ४६ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. १८६ धावांचे मोठे लक्ष्य घेऊन मैदानात उतलेल्या विंडीजचा संघ २० षटकात ९ बाद १०१ धावांवर आटोपला. भारतीय गोलंदाज शिखा पांडे, राधा यादव आणि पूनम यादव या तिकडीने प्रत्येकी २ गडी बाद केले.

Last Updated : Nov 10, 2019, 11:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details