जमैका -वेस्ट इंडीज संघाच्या निवड समितीने, ख्रिस गेलसह अनुभवी खेळाडूंना आगामी भारत दौऱ्यासाठी 'डच्चू' दिले आहे. वेस्ट इंडीजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात विडींज पहिले भारतात अफगाणिस्तानच्या संघाविरुध्द एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघाबरोबर एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. दौऱ्यातील अफगाणिस्तान विरुध्दच्या मालिकेसाठी विडींजने आपला संघ जाहीर केला आहे.
निवड समितीने, स्फोटक फलंदाज ख्रिस गेल, अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आणि शेनन गॅब्रियलला संघात स्थान दिलेले नाही. ब्रँडन किंग याच्यासह वेगवान गोलंदाज अल्झरी जोसेफला संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच हेडन वाल्सलाही संघात जागा मिळाली आहे. तिघेही यापूर्वी विडींजसाठी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
- अफगाणिस्तान विरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी विडींजचा संभाव्य संघ -
जेसन होल्डर (कर्णधार), शाई होप, जॉन कॅम्पबेल, क्रेग ब्रेथवेट , शिमरोन हेटमायर, शामर्ह ब्रूक्स, रोस्टन चेस, शेन डॉरिच, सुनील अंब्रिस, जोमेल वॉरिकन, रकीम कोर्नवाल, केमार रोच, कीमो पॉल आणि अल्झरी जोसेफ. - अफगाणिस्तान विरुध्दच्या एकदिवसीय मालिकेसाठी विडींजचा संभाव्य संघ -
किरॉन पोलार्ड (कर्णधार), शाई होप, इविन लुईस, शिमरोन हेटमायर, सुनील अंब्रिस, निकोलस पूरन, ब्रँडन किंग, रोस्टन चेस, जेसन होल्डर, हेडन वाल्श, खैरी पियरे, शेल्डन कॉटरेल, कीमो पॉल, अल्झरी जोसेफ आणि रोमारियो शेफर्ड. - अफगाणिस्तान विरुध्दच्या टी-२० मालिकेसाठी विडींजचा संभाव्य संघ -
किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन, ईवन लुईस, ब्रँडन किंग, शिमरोन हेटमायर, शेरफन रदरफोर्ड, जेसन होल्डर, लेंडल सिमन्स, फॅबियन एलेन, हेडन वाल्श Jr., खैरी पियरे, शेल्डन कॉटरेल, दिनेश रामदीन, केसरिक विलियम्स आणि अल्झरी जोसेफ.