महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND VS WI : भारत-वेस्ट इंडिज संघात आज लढत, आकडेवारी पहिल्यास 'हा' संघ अव्वल - west indies tour 2019

उभय संघामध्ये १२८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने ६० सामन्यात विजय मिळवला आहे. तर ६२ सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. दोन सामने अनिर्णयीत राहिले आहेत तर चार सामन्याचा निकाल लागलेला नाही.

IND VS WI : भारत-वेस्ट इंडिज संघात आज लढत, आकडेवारी पहिल्यास 'हा' संघ अव्वल

By

Published : Aug 11, 2019, 8:30 AM IST

पोर्ट ऑफ स्पेन - भारत विरुध्द वेस्ट इंडिज संघातील दुसरा एकदिवसीय सामना आज ( रविवारी ) पोर्ट ऑफ स्पेन मध्ये रंगणार आहे. तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. यामुळे या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी उत्सुक असणार आहे.

भारत विरुध्द वेस्ट इंडिज - एकदिवसीय आकडेवारी
उभय संघामध्ये १२८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने ६० सामन्यात विजय मिळवला आहे. तर ६२ सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. दोन सामने अनिर्णयीत राहिले आहेत तर चार सामन्याचा निकाल लागलेला नाही.

भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी-२० मालिका ३-० अशा एकतर्फी जिंकली. त्यानंतर एकदिवसीय मालिका सुरू असून पहिला सामना १३ षटकानंतर पावसामुळे रद्द झाला होता. दरम्यान, या सामन्यात श्रेयस अय्यरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार असून त्याला संघातील चौथे स्थान पक्के करण्यासाठी ही मोठी संधी आहे.

भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र्र जडेजा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज संघ -
जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, शिमरोन हेटमायर, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, कार्लोस ब्रेथवेट, शाय होप, निकोलस पूरण, रोस्टन चेज, फॅबियन अ‍ॅलेन, कीमो पॉल, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस आणि केमार रोच.

ABOUT THE AUTHOR

...view details