नवी दिल्ली - वेस्ट इंडिज संघाला पहिल्यांदा 'विश्वविजेते' अशीओळख मिळवून देणारे क्लाईव्ह लॉईड आता नव्या उपाधीने ओळखले जाणार आहेत. या नवीन वर्षात लॉईड यांना नाईटहूडची उपाधी देण्यात येणार असून त्यांचा समावेश सर गॅरी सोबर्स, सर एव्हर्टन वीक्स आणि सर व्हिव्ह रिचर्ड्स यांच्या क्लबमध्ये होणार आहे.
हेही वाचा -निखतला हरवल्यानंतर मेरीने धुडकावला हात, पाहा व्हिडिओ
लॉईड यांनी १९७४ ते १९८५ पर्यंत वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वातच विंडीजने १९७५ मध्ये प्रथमच विश्वचषक जिंकला. त्यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे विंडीजचा संघ विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला.
लॉईड यांच्या नेतृत्वात कॅरेबियन संघाने एकही सामना न गमावता २६ सामने जिंकले होते. ११० कसोटींमध्ये त्यांनी ४६ च्या सरासरीने एकूण ७५१५ धावा केल्या. यावेळी लॉईड यांनी एकूण १९ शतके आणि ३९ अर्धशतके झळकावली होती.