महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वेस्ट इंडिजच्या दोन क्रिकेटपटू बंधूना कोरोनाची लागण

यष्टीरक्षक-फलंदाज टेव्हिन वालकोट आणि जाच्री मॅकस्की यांनी बार्बोडोस संघात होप बंधुची जागा घेतली आहे. या दोघांनाही कोरोनाच्या सर्व चाचण्या पार कराव्या लागतील. सुपर ५० चषकाद्वारे वेस्ट इंडिजमध्ये क्षेत्रीय ५० षटकांच्या क्रिकेटचे पुनरागमन होत असल्याचे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने सांगितले आहे.

By

Published : Jan 27, 2021, 4:21 PM IST

west indies cricketers shai hope and kyle hope test positive for coronavirus
वेस्ट इंडिजच्या दोन क्रिकेटपटू बंधूना कोरोनाची लागण

ब्रिजटाउन (बार्बाडोस) -वेस्ट इंडिजचा फलंदाज शाई होप आणि त्याचा भाऊ काइल होप कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. या चाचणीनंतर त्यांना आगामी सुपर ५० चषकातून वगळण्यात आले. बार्बाडोस क्रिकेट असोसिएशनच्या वृत्तानुसार, दोघेही क्वारंटाइन आहेत.

शाई होप आणि त्याचा भाऊ काइल होप

यष्टिरक्षक-फलंदाज टेव्हिन वालकोट आणि जाच्री मॅकस्की यांनी बार्बोडोस संघात होप बंधुंची जागा घेतली आहे. या दोघांनाही कोरोनाच्या सर्व चाचण्या पार कराव्या लागतील. सुपर ५० चषकाद्वारे वेस्ट इंडिजमध्ये क्षेत्रीय ५० षटकांच्या क्रिकेटचे पुनरागमन होत असल्याचे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने सांगितले.

हेही वाचा - BREAKING..! सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात दाखल

क्रिकेट वेस्ट इंडिजने (सीडब्ल्यूआय) फेब्रुवारीमध्ये अँटिगा येथे होणार्‍या या स्पर्धेचे वेळापत्रक पुन्हा जाहीर केले आहे. सुपर ५० चषक स्पर्धेत सहा प्रादेशिक प्रतिस्पर्धी बार्बाडोस प्राइड, गयाना जग्वार, जमैका स्कॉर्पियन्स, लेवर्ड आयलँड्स हरिकेन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो रेड फोर्स आणि विंडवर्ड आयलँड्स वोल्कानोस संघ खेळतील.

७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत सहा संघ १९ सामने खेळतील. पहिल्या सामन्यात विंडवर्ड आयलँड्स वोल्कानोस सामना आयलँड्स व्होल्कोनासशी होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details