लंडन - विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल मायदेशी होणाऱ्या आगामी भारताच्या दौऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत गेल बोलताना म्हणाला की, 'विश्वकरंडक स्पर्धा ही माझ्या कारकिर्दीचा शेवट नाही. कदाचित मी भारताविरुद्ध होणारी कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळेण. मात्र, यानंतर होणारी टी-२० मालिका मी खेळणार नाही.'
स्फोटक फलंदाज ख्रिस गेल या मालिकेनंतर होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
भारतीय संघ येणाऱ्या ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात ३ टी-२० सामने, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.
भारतीय संघ येणाऱ्या ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात ३ टी-२० सामने, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. भारत ३ ऑगस्टला पहिला टी-२० सामना खेळेल तर दौऱ्याचा शेवट कसोटी मालिकेने होईल.
ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९९९ मध्ये पदार्पण केले होते. गेल्या २० वर्षात एकापेक्षा एक विस्फोटक खेळी करून त्याने लाखो क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. अनेक विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. अष्टपैलू गेलने वेस्ट इंडीजतर्फे एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५ शतके ठोकली असून त्याच्या फिरकीने १६६ बळीही घेतले आहेत.