महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विंडीजचा 'सॅल्यूटकिंग' कॉटरेल  लेफ्टनंट कर्नल धोनीचा दिवाना, म्हणाला... - विंडीज

आपल्या गोलंदाजीने आणि सैन्यप्रेमामुळे लोकांना भूरळ पाडणारा कॉटरेलच धोनीचा 'फॅन' झाला आहे.

विंडीजचा 'सॅल्यूटकिंग' कॉटरेल  झाला लेफ्टनंट कर्नल धोनीचा दिवाना, म्हणाला...

By

Published : Jul 29, 2019, 12:25 PM IST

नवी दिल्ली - यंदाची आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा अनेक कारणांमुळे लक्षात राहिली. वेस्ट इंडिजचा डावखुरा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरेल आपल्या सॅल्यूटमुळे चांगलाच लक्षात राहिला. आपल्या गोलंदाजीने आणि सैन्यप्रेमामुळे लोकांना भूरळ पाडणारा कॉटरेलच धोनीचा 'फॅन' झाला आहे.

विश्वकरंडक स्पर्धा आटोपल्यानंतर, धोनीने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. भारताचा हा माजी कर्णधार सैन्यासोबत दोन महिने काश्मीरमध्ये गस्त घालणार आहे. हे देशप्रेम पाहून विंडीजचा कॉटरेल ही प्रभावित झाला आहे. त्याने धोनीबद्दल एक ट्विट करत त्याच्या सैन्यप्रेमाचे कौतूक केले आहे. कॉटरेल ने ट्विटमध्ये म्हटले आहे, 'हा माणूस क्रिकेटच्या मैदानावर प्रेरणादायी आहे. यासोबत तो, देशभक्त आणि कर्तव्यापलिकडे देशासाठी काहीतरी करणारा माणूस आहे.'

कॉटरेलने या ट्विटसोबत धोनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने धोनीचे कौतूक केले आहे. या व्हिडिओत कॉटरेलने म्हटले आहे, 'हा व्हिडिओ मी माझ्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर केला आहे. कारण त्यांना माहित आहे की ही भावना कशी असते.पती आणि पत्नी यांच्यातील तो एक क्षण देशासाठी प्रेमाचे वास्तव दर्शवतो. जसा मी घेतला तसा तुम्ही देखील याचा आनंद घ्या'.

विश्वकरंडक स्पर्धेनंतर, धोनीच्या संथ खेळीमुळे निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details