हैदराबाद - टीम इंडिया वेस्ट इंडीज विरुध्दच्या टी-२० मालिकेला हैदराबादमधून सुरुवात करणार आहे. उभय संघात ६ डिसेंबरला पहिला टी-२० सामना होणार असून या सामन्यापूर्वी विंडीजच्या संघाने नवी खेळी केली आहे. भारताला रोखण्यासाठी विंडीजने माँटी देसाई यांना फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून नेमले आहे.
हेही वाचा -VIDEO : वहाबने टाकला क्रिकेट इतिहासातील खतरनाक यॉर्कर, पण...
माँटी देसाई यांच्यासोबत विंडीजने दोन वर्षांचा करार केला आहे. यापूर्वी देसाईंनी अफगाणिस्तान, नेपाळ, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्स या संघांचे प्रशिक्षकपद भूषविले आहे. शिवाय, देसाई यांनी संयुक्त अरब अमिराती आणि कॅनडा संघाच्या प्रशिक्षकपदाची भूमिका पार पाडली आहे.
भारत-वेस्ट इंडीज संघात ३ सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिला सामना ६ डिसेंबरला हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.