नवी दिल्ली - भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपला एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. स्फोटक फलंदाज आणि यूनिव्हर्सल बॉस म्हणून ओळख असलेल्या ख्रिस गेलचा या संघात समावेश केला आहे.
विंडिजच्या या संघात सलामीवीर फलंदाज जॉन कॅम्बेल आणि अष्टपैलू किमो पॉललाही संधी मिळाली आहे. गेलची ही शेवटची एकदिवसीय मालिका असल्याचे म्हटले जात आहे. ३९ वर्षीय गेलने २९८ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने २५ शतके आणि ५३ अर्धशतके लगावली आहेत. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली होती.
विंडिजस आणि टीम इंडिया या संघात 3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय सामने आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी विराटलाच कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी विंडिजचा संघ -
- जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एव्हिन लुईस, शाय होप, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोस्टन चेस, फॅबियन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, केमार रोच.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, यझुवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.