मुंबई- वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रोव्होने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक नवीन गाणं लॉन्च केलं आहे. यात तो जगातील सर्व लोकांचे मनोबल वाढत आहे.
ब्राव्होने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला असून यातून तो आपल्या चाहत्यांनाही एक सकारात्मक संदेश देत आहे. गाण्याचे बोल 'वी नॉट गिव्हिंग अप' (We Not Giving Up) असे असून ब्राव्हो या गाण्याच्या माध्यमातून आम्ही हार मानणार नाही, असं म्हणत आहे.
३६ वर्षींय ब्राव्हो आपल्या नवीन गाण्याच्या माध्यमातून सद्याची परिस्थिती किती वाईट आहे, हे सांगत आहे. तो या गाण्यातून कोरोना लवकरात लवकर थांबावा, अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. या बरोबरच, ब्राव्होने आपल्या चाहत्यांना निरोगी राहण्यासाठी नियमितपणे हात धुणे आणि सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणे, यासारखी योग्य काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.