कोलकाता - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला काल शनिवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी संध्याकाळी गांगुलीची भेट घेतली.
हेही वाचा - विराटच्या संघाकडून खेळण्यास स्टेनचा नकार
या भेटीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, "आता त्यांची तब्येत ठीक आहे. त्यांनी माझ्या आरोग्याबद्दल विचारले. मी रुग्णालय व डॉक्टरांचे आभार मानले. ते एक महान क्रिकेटपटू आहेत. इतक्या लहान वयातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला हे पाहून मला वाईट वाटले. मी विचारही करू शकत नाही. सर्व खेळाडूंची आरोग्य तपासणी चालू ठेवावी. हॉस्पिटल आणि डॉक्टरांनी चांगले काम केले आहे.''