मुंबई - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच यांनी नविन वर्षाच्या सुरूवातीला साखरपुडा केला. दुबईत झालेल्या या साखरपुड्याची माहिती हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली. हार्दिक आणि नताशा यांच्या साखरपुड्याला त्याचा भाऊ कृणाल पांड्याही उपस्थित होता. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून नताशाचे स्वागत केले.
हार्दिक आणि नताशा या जोडीने दुबईत गुपचूप साखरपुडा उरकला. हार्दिकनं क्रुझवर फिल्मी स्टाईलने नताशाला प्रपोज केले. त्यांच्या या साखरपुड्याला हार्दिकचा भाऊ कृणाल आणि त्याची पत्नी पंखुरी यांच्यासह काही जवळचे मित्र हजर होते.