नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच सौरव गांगुली यांनी वेगवेगळे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सुरूवातीला भारत-बांगलादेश यांच्यात दिवस-रात्र कसोटी सामन्यांचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर आता युवा खेळाडूंसाठी युवा खेळाडूंना मोठे गिफ्ट दिले आहे.
प्रथम श्रेणीमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठीही करार करण्यासाठी गांगुली उत्सुक आहेत. या करारा अंतर्गत या खेळाडूंना पगार किंवा फी मिळणार आहे. नवी व्यवस्थेनुसार युवा खेळाडूंना वित्तीय सुरक्षा देण्याचा निर्णय गांगुली यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने प्रथम श्रेणीमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची आर्थिक समस्या संपुष्टात येईल, असे बोलले जात आहे.