मेलबर्न - पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शानदार पुनरागमन केले. ऑस्ट्रेलियाला या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून धूळ चारली. पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने, संघाच्या खराब प्रदर्शनावर नाराजी व्यक्त केली.
सामना संपल्यानंतर टीम पेन म्हणाला की, आम्ही खराब खेळलो. सामन्यातील महत्वाच्या क्षणी आमचे प्रदर्शन निराशजनक होते. भारतीय संघाला या विजयाचे श्रेय दिले पाहिजे. त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यावर आम्हाला चूक करण्यास भाग पाडले. तुम्ही एका तुल्यबळ संघासोबत खेळताना अशा चूका करू शकत नाही. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात.
दरम्यान, टीम पेनने युवा खेळाडू कॅमरुन ग्रीन याचे कौतूक केले. तो म्हणाला की, ग्रीन याने धैर्य दाखवत भारतीय गोलंदाजांचा सामना केला. यावरुन त्याची गुणवत्ता दिसते. ती सामन्यागणिक वाढत जाईल.