चेन्नई - आयपीएल २०१९ च्या १२ व्या हंगामाला उद्या शनिवारपासून सुरूवात होत आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात पहिला सामना के.एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी या सामन्याच्या तयारीसाठी मैदानात चांगलाच घाम गाळला. यावेळी महेंद्र सिंह धोनी सीमारेषे जवळ उभ्या राहिलेल्या छोट्या बच्चे कंपनीला ऑटोग्रॉफ देण्यासाठी स्टेडियममध्ये गेला. त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासारखा होता.
VIDEO: ... अन् धोनीने दिलेल्या ऑटोग्राफन मुलांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता आनंद - आयपीएल २०१९ च्या १२ व्या हंगामाला
धोनीने उपस्थित सर्व मुलांना ऑटोग्राफ दिला. त्याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत ट्वीटवर शेअर केला आहे.
महेंद्र सिंह धोनी
धोनी सराव करताना छोट्या मुलांनी धोनी...धोनी... म्हणत एकच गलका केला. धोनीने या मुलांना नाराज न करता त्यांना ऑटोग्राफ दिला. त्याने ऑटोग्राफ दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडू वाहत होता. धोनीने उपस्थित सर्व मुलांना ऑटोग्राफ दिला. त्याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत ट्वीटवर शेअर केला आहे.