नवी दिल्ली- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अखेर बॉटल कॅप चॅलेज पूर्ण केले. विराटने शनिवारी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला त्याने 'कधीच न केल्यापेक्षा, उशिरा केलेले कधीही चांगले' असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर #bottlecapchallenge चा धुमाकूळ सुरू आहे. तसेच यापूर्वी भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंगसह याने देखील हे चॅलेंज पूर्ण केले होते.
मजेशीर बाब म्हणजे, कर्णधार कोहलीने अपलोड केलेल्या व्हिडिओला सध्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा समालोचक करतानाचा आवाज देखील देण्यात आला आहे.