हैदराबाद -कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प झाले असून क्रीडाविश्वालाही या व्हायरसचा जोरदार फटका बसला आहे. या व्हायरसच्या भीतीमुळे अनेक मोठ्या स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडू आपला वेळ कुटुंबीयांसोबत व्यतित करत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाही आपल्या कुटुंबासोबत असून त्याचा घरात क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुलीसोबत रैना खेळतोय क्रिकेट... पाहा व्हिडिओ - suresh raina playing cricket with gracia news
आयपीएल फ्रँचायझी सीएसकेने ट्विटरवर रैनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपली मुलगी ग्रासियासोबत घरात क्रिकेट खेळताना दिसत आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी रैनाने पीएम-केअरला ३१ लाख आणि यूपीच्या सीएम रिलीफ फंडाला २१ लाखांची देणगी दिली आहे.

मुलीसोबत रैना खेळतोय क्रिकेट...पाहा व्हिडिओ
आयपीएल फ्रँचायझी सीएसकेने ट्विटरवर रैनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपली मुलगी ग्रासियासोबत घरात क्रिकेट खेळताना दिसत आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी रैनाने पीएम-केअरला ३१ लाख आणि यूपीच्या सीएम रिलीफ फंडाला २१ लाखांची देणगी दिली आहे.
कोरोनामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द झाल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. बीसीसीआयने अद्याप याची घोषणा केलेली नाही.