ख्राईस्टचर्च - ऑस्ट्रेलियाची स्टार महिला खेळाडू एलिस पेरी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. ती तब्बल एक वर्षानंतर पुनरागमन करणार आहे. महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत एलिसला दुखापत झाली होती. यामुळे ती क्रिकेटपासून लांब होती.
दुखापतीतून सावरल्यानंतर एलिस महिला बिग बॅश स्पर्धेत उतरली होती. पण या स्पर्धेत तिच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले. आता ती दुखापतीतून संपूर्णपणे बरी झाली आहे. एलिस न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पुनरागमन करणार आहे.
एलिसने सांगितलं, 'मला वाटत की, मी हॅमस्ट्रिंग दुखापतीतून सावरली आहे. आता मी फलंदाजी आणि गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.'