रायपूर - भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी ९ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००व्या शतकाला गवसणी घातली होती. विशेष म्हणजे असा विक्रम करणारा तो आजही जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. भारताच्या माजी खेळाडूंनी या विक्रमांचा आनंद सचिन समवेत साजरा केला. याचा व्हिडिओ भारताचा माजी खेळाडू प्रग्यान ओझाने शेअर केला.
सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, इरफान पठाण, युसुफ पठाण आणि प्रग्यान ओझा यासह भारताचे अनेक माजी खेळाडू रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळत आहेत. ९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिनने बांग्लादेशविरुद्ध आशिया करंडकात शतक झळकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००व्या शतकाला गवसणी घातली होती. या विक्रमाचा आनंद माजी खेळाडूंनी सचिन समवेत केक कापून साजरा केला.
प्रग्यान ओझाने शेअर केलेल्या व्हिडिओत, सचिन केक कापताना दिसून येत आहे. सचिनने केक कापल्यानंतर तो केक युवराज सिंह सचिनला भरवताना पाहायला मिळत आहे.