महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पिक्चर अभी बाकी है..! रोहितने सरावादरम्यान मारलेला षटकार थेट मैदानाबाहेर; पाहा व्हिडिओ - मुंबई विरुद्ध चेन्नई

मुंबई इंडियन्सने अबूधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळाडू सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीचा सराव करताना पाहायला मिळत आहे. रोहितने एक चेंडू जोरात टोलावला. हा चेंडू थेट मैदानाबाहेर गेला आणि आणि मैदानाबाहेरुन जाणाऱ्या एका धावत्या बसला चेंडू लागला.

WATCH: Rohit Sharma's stunning 95-metre six lands on rooftop of moving bus in Abu Dhabi
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...! रोहितने सरावादरम्यान मारलेला षटकार थेट मैदानाबाहेर

By

Published : Sep 10, 2020, 12:29 PM IST

अबूधाबी - आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. स्पर्धेसाठी सर्व संघ युएईमध्ये कसून सराव करत आहेत. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात १९ सप्टेंबरला सलामीचा सामना रंगणार आहे. यादरम्यान, मुंबईच्या संघातील खेळाडू सराव सत्रात भरपूर मेहनत घेत आहेत. सराव सत्रात कर्णधार रोहित शर्मा जोरदार फटकेबाजी करताना पाहायला मिळाला. त्याने टोलावलेला चेंडू थेट मैदानाबाहेर गेला.

मुंबई इंडियन्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सचा संघ अबूधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर सराव करतानाचा आहे. यात कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीचा सराव करताना पाहायला मिळत आहे. रोहितने एक चेंडू जोरात टोलावला. हा चेंडू थेट मैदानाबाहेर गेला आणि आणि मैदानाबाहेरुन जाणाऱ्या एका धावत्या बसला चेंडू लागला.

दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा हंगाम यूएईमध्ये खेळवण्यात येत आहे. ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान, रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिन मंगळवारी अबूधाबीमध्ये त्याच्या आयपीएल संघात म्हणजेच मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. फ्रेंचायझीने ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा जेम्स पॅटिन्सन आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट यूएईत दाखल झाले होते. यामुळे मुंबई इंडियन्सची ताकत वाढली आहे.

दुसरीकडे कोरोनामुळे तब्बल ४ महिने क्रिकेटपासून लांब असलेले खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे सलामीच्या सामन्यात मुंबईचा संघ कशी कामगिरी करतो आणि रोहित शर्मा आपल्या लौकिकाला साजेशी फटकेबाजी करतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा -युवराज सिंग निवृत्तीचा निर्णय मागे घेणार?

ABOUT THE AUTHOR

...view details