पोर्ट ऑफ स्पेन - भारत विरुध्द वेस्ट इंडिजचा पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर आज (रविवारी ) दुसरा एकदिवसीय सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर रंगणार आहे. मात्र, या सामन्यावरही पावसाचे संकट कायम आहे. पावसामुळे भारतीय संघातील खेळाडूंनी कुणी छत्री घेत तर कुणी हॉटेलमध्येच इनडोअर सराव केला.
VIDEO : 'हिटमॅन' रोहितचा छत्री घेऊन तर पंतचा हॉटेलमध्ये 'इनडोअर' सराव - बीसीसीआय बातमी
आज (रविवारी )दुसरा एकदिवसीय सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर रंगणार आहे. मात्र, या सामन्यावरही पावसाचे संकट कायम आहे. पावसामुळे भारतीय संघातील खेळाडूंनी कुणी छत्री घेत तर कुणी हॉटेलमध्येच इनडोअर सराव केला.
बीसीसीआयने रोहित शर्मा सराव करत असताना पाऊस आल्यानंतर छत्री घेऊन बॅटसह थांबलेल्या अवस्थेतील फोटो ट्विट केला आहेत. तर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने हॉटेलमध्ये इनडोअर सराव करतानाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. पंतने शेअर केलेल्या व्हिडिओला तो कुलदीप यादवसोबत सराव करत आहे. त्याने या व्हिडिओला त्याने, कुठे, कधी, काय आणि कोण...नो स्वारी.. का ते माहिती नाही, असे कॅप्शन दिले आहे.
विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ पहिलाच परदेश दौरा करत आहे. या वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघाने टी-२० मालिका ३-० अशी एकतर्फी जिंकली आहे.