हॅमिल्टन- भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धावांचा डोंगर उभारला. श्रेयस अय्यर, विराट कोहली आणि केएल राहुल या त्रिकुटांने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धू-धू धुतले आणि ३४७ धावा उभारल्या. दरम्यान, या सामन्यात केएल राहुलने मारलेला षटकार चर्चेचा विषय ठरला आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा भारताकडून मयांक अगरवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी सलामीला उतरली. दोघांनी अर्धशतकी सलामी दिली. दोघे बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. विराट ५१ धावांवर बाद झाला. तेव्हा केएल राहुलने मैदानात एन्ट्री घेतली. अय्यर-राहुल या जोडीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पळवले. यादरम्यान, राहुलने जिम्मी निशामने टाकलेल्या ४८ षटकात रिव्हर्स स्वीपने षटकार खेचला. राहुलचा हा षटकार पाहून निशामही अवाक झाला.