मुंबई- कोरोनामुळे जगभरातील जवळपास सर्व स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशात सर्व खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडू कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अष्ठपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही प्रेयसी नताशा स्टँकोव्हिचसह घरीच वेळ घालवत आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओत हार्दिक हिंदीमध्ये नताशाला विचारतो, 'बेबी मैं क्या हूँ तेरा?', यावर नताशा हिंदीमध्ये उत्तर देते. नताशा त्याला 'जिगर का तुकडा', असे उत्तर देते. तिच्या या उत्तरावर दोघेही हसतात. पण नताशा सर्बियन असल्याने तिला जिगर का तुकडा या शब्दांचे उच्चार व्यवस्थित करता येत नाहीये.