सिडनी - क्रिकेटमध्ये कधी काय होईल, याचा नेम नसतो. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो. तर कधी एखादा गोलंदाज हातात असलेला सामना सुमार गोलंदाजीने गमावतो. काही वेळा तर क्षेत्ररक्षक एखादा सोपा झेल सोडतो. तर कधी खेळाडू एकादा असा झेल पकडतो की, सगळेच आवाक होतात. नुकताच असाच एक झेल बिग बॅश लिगमध्ये पाहायला मिळाला.
बिग बॅश लिगमध्ये इंग्लंडचा ख्रिस जॉर्डनने एक अप्रतिम झेल घेतला. पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगॅडेस यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पर्थ स्कॉचर्सचा ख्रिस जॉर्डनने अफलातून झेल घेतला. याचा एक व्हिडिओ बिग बॅशने आपल्या सोशल अकाऊंवरुन शेअर केला आहे.
सामन्याचे १८ वे षटक फवाद अहेमदने टाकले. त्याच्या पाचव्या चेंडूवर रेनेगॅडेसचा फलंदाज डॅनिएल ख्रिस्टीयनने जोरदार फटका लगावला. तेव्हा सीमारेषेवर उभा असलेल्या जॉर्डनने अफलातून झेल घेत सर्वांची वाहवाह मिळवली.