महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'या' दिग्गज गोलंदाजाने माझे करिअर संपविले - वसीम जाफर

जाफरला भारतीय क्रिकेटचा मिस्टर क्रिकेट म्हटले जाते. तो दहाव्यांदा रणजी चषकाच्या विजेत्या संघाचा सदस्य आहे. रणजीत सर्वाधिक धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आहेत.

वसीम जाफर

By

Published : Feb 12, 2019, 11:31 PM IST

मुंबई - स्थानिक सामन्यात विक्रमांचा पाऊस पाडणाऱ्या वसीम जाफरला अचानक ११ वर्षांपूर्वी २००८ मध्ये केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आठवण झाली. हा दौरा आजही वसीमच्या चांगलाच लक्षात आहे. या दौऱ्यात ब्रेट ली च्या गोलंदाजीवर वसीम जाफर संघर्ष करताना दिसला होता. ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज गोलंदाजाने आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपविल्याचा खुलासा स्वत: वसीम जाफरने केला.

जाफर बोलताना म्हणाला की, या दौऱ्यात मी ब्रेट लीच्या गोलंदाजीवर खेळताना चाचपडत होतो. त्याला कसे खेळायचे हे मला समजत नव्हते. या मालिकेत चांगली कामगिरी न केल्याने मी निराश झालो. या दौऱ्यानेच माझे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संपविल्याची कबुली जाफरने दिली.

वसीम जाफरचे आंतरराष्ट्रीय करिअर खूपच शानदार ठरले. २००६ च्या विंडीज दौऱ्यात त्याने द्विशतक ठोकले होते. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱयातही त्याने चांगल्या धावा केल्या. पण २००८च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याने त्याचे भारताकडून परत क्रिकेट खेळण्याचे स्वप्न हिरावून घेतले.

या बाबत बोलताना जाफर म्हणाला की, आपल्या नशीबात जितके असते तितकेच मिळते. त्यापेक्षा जास्त अपेक्षा करणे चुकीचे आहे. जे मिळाले त्यात समाधानी असले पाहिजे. मला जे काही मिळाले ते विचार करुनच निर्मात्याने दिले असावे असे जाफर म्हणाला.

जाफरला भारतीय क्रिकेटचा मिस्टर क्रिकेट म्हटले जाते. तो दहाव्यांदा रणजी चषकाच्या विजेत्या संघाचा सदस्य आहे. रणजीत सर्वाधिक धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आहेत. दुलीप ट्रॉफी, इराणी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीत त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. यंदाच्या रणजीत त्याने १ हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

वसीम जाफरने ३१ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने १९४४ धावा केल्या. जाफरला एकदिवसीय क्रिकेटमध्येही छाप पाडता आली नाही. तो केवळ दोनच सामने खेळला. त्यात त्याने १० धावा केल्या आहेत. तर आयपीएलच्या ८ सामन्यात १३० धावा केल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details