मुंबई -ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचे तोंड पहावे लागले. महत्वाचे म्हणजे पहिल्या डावात भारतीय संघाने आघाडी मिळवली. पण दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी सरळसरळ शरणागती पत्कारली. भारताचा दुसरा डाव ३६ डावात आटोपला. यानंतर ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला. या पराभवानंतर भारतीय संघावर टीकेचे झोड उठली आहे. अशात काही माजी खेळाडूंनी भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यास पुढाकार घेतला आहे. यात भारताचा माजी क्रिकेट वसीम जाफरने दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला शुभेच्छा देत कर्णधार अजिंक्य रहाणेला एक मॅसेज दिला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात 'बॉक्सिंग डे' सामना होणार आहे. या सामन्याआधी वसिम जाफरने रहाणेसाठी एक ट्विट केले आहे. यात त्याने लिहलं आहे की, डियर अजिंक्य रहाणे, या ट्विटमध्ये तुझ्यासाठी एक खास मॅसेज लपलेला आहे. बॉक्सिंग डे कसोटीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाफरने रहाणेला टॅग करत हा ट्विट डिकोड करण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे जाफरच्या मॅजेसचा अर्थ
दरम्यान, जाफरने अजिंक्यसाठी लिहलेल्या या मॅसेजचा अर्थ असा आहे की, बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात शुभमन गिल आणि लोकेश राहुल यांना संघात स्थान द्यायला हवं, असा आहे.