मुंबई- भारतीय संघाचा माजी फलंदाज वसिम जाफरने आपला ऑलटाईम एकदिवसीय संघ निवडला आहे. यात जाफरने महेंद्रसिंह धोनीसह चार भारतीय खेळाडूंना स्थान दिले आहे. त्याने संघाचे नेतृत्व धोनीकडे सोपवले आहे.
जाफरने आपला १२ सदस्यीय संघ निवडला असला तरी त्याने एकूण १३ खेळाडू निवडले आहे. यात त्याने शेर्न वॉर्न आणि सकलेन मुस्ताक यांच्यापैकी एक अशी निवड केली आहे. जाफरने आपच्या संघात भारताचे चार, ऑस्ट्रेलियाचे तीन, वेस्ट इंडीजचे दोन, पाकिस्तानचे दोन, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड याचे प्रत्येकी १-१ खेळाडूची निवड केली आहे.
जाफरच्या संघात भारताचा माजी मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली आणि धोनी हे चार भारतीय खेळाडू आहेत.
जाफरने, सचिन आणि रोहित शर्माला सलामीवीर म्हणून पसंती दिली आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी त्याने वेस्ट इंडीजचे महान खेळाडू व्हीव्हीएस रिचर्डस यांना ठेवलं आहे. चौथ्या क्रमांकार भारताचा कर्णधार विराट कोहली आहे. पाचव्या आणि सहाव्या क्रमाकांवर अनुक्रमे एबी डिव्हिलियर्स आणि बेन स्टोक्सला पसंती दिली आहे. धोनीला जाफरने सातव्या क्रमांकावर ठेवले आहे.
गोलंदाजीत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रम, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेर्न वॉर्न आणि पाकचा सकलेन मुस्ताक यांच्यापैकी एक असे त्याने निवडलं आहे. याशिवाय वेस्ट इंडीजचे जोएल गार्नर, ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्राचा गोलंदाजी विभागात समावेश आहे. १२ वा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आहे.
जाफरने निवडलेला आपला एकदिवसीय संघ -
- सचिन तेंडुलकर
- रोहित शर्मा
- व्हीव्हीएन रिचर्डस
- विराट कोहली
- एबी डिव्हिलियर्स
- बेन स्टोक्स
- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार)
- वसिम अक्रम
- शेर्न वॉर्न/ सकलेन मुस्ताक
- जोएल गार्नर
- ग्लेन मॅकग्रा
- रिकी पाँटिंग