महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वसिम अक्रम बायकोसोबत करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण - वसिम अक्रम फवाद खानसोबत झळकणार

अक्रमने पाकिस्तानमध्ये 'मनी बॅक गॅरंटी' नावाचा एक विनोदी चित्रपट साइन केला आहे. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार तो आपल्या पत्नीसह या चित्रपटात झळकणार असून पाकिस्तानचे विनोदी कलावंत फैसल कुरेशी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

वसिम अक्रम बायकोसोबत करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण,

By

Published : Oct 26, 2019, 5:25 PM IST

कराची -आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा पाकिस्तानचा दिग्गज माजी गोलंदाज वसीम अक्रम एका नवीन भूमिकेत दिसणार आहे. अक्रम आता अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणार असून तो या क्षेत्रात यशस्वी ठरतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा -'कोहलीसारखं बनायचंय मला', पाकिस्तानच्या कर्णधाराची इच्छा

अक्रमने पाकिस्तानमध्ये 'मनी बॅक गॅरंटी' नावाचा एक विनोदी चित्रपट साइन केला आहे. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार तो आपल्या पत्नीसह या चित्रपटात झळकणार असून पाकिस्तानचे विनोदी कलावंत फैसल कुरेशी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

दिग्दर्शन म्हणून कुरेशी यांचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे. वृत्तानुसार, पाकिस्तानचा स्टार अभिनेता फवाद खान या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसेल. फवादने 'खूबसूरत' आणि 'कपूर अँड सन्स' या बॉलिवूडपटांत काम केले होते.

या चित्रपटात वसीम अक्रमची पत्नी शनायरा अक्रम छोट्य़ा भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे अक्रम आणि शनायरा यांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री कशी असेल, हे पाहणं रंजक ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details