बर्मिघम - पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज वसीम अक्रमने कर्णधार सरफराज अहमदला न्यूझीलंड सामन्यापूर्वी एक मोलाचा सल्ला दिला आहे. तो म्हणतो की, सरफराजने न्यूझीलंड विरुध्दच्या सामन्यात संघामध्ये कोणताही बदल करु नये, असे त्याने सांगितलं आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या संघाने मागील सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा ४९ धावांनी पराभव करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे.
ICC WC २०१९ : न्यूझीलंड सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा सरफराजला मोलाचा सल्ला, म्हणाला... - SARFRAZ AHMED
पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज वसीम अक्रमने कर्णधार सरफराज अहमदला न्यूझीलंड सामन्यापूर्वी एक मोलाचा सल्ला दिला आहे. तो म्हणतो की, सर्फराजने न्यूझीलंड विरुध्दच्या सामन्यात संघामध्ये कोणताही बदल करु नये, असे त्याने सांगितलं आहे.
पाकिस्तानचा संघ १९९२ सालाची पुनरावृत्ती करणार असल्याची, आशाही त्याने व्यक्त केली. १९९२ च्या विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडच्या संघ एकदाही पराभूत झाला नव्हता. तेव्हा पाकिस्तानने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव केला होता. याच इतिहासाची पुनरावृत्ती या विश्वकरंडकमध्ये होईल, असा आशावाद अक्रमने बोलून दाखवला.
दक्षिण अफ्रिका संघाविरुध्द झालेल्या सामन्यात पाकिस्तानने ४९ धावांनी विजय मिळवला. मात्र, या सामन्यात पाकिस्तानने क्षेत्ररक्षणात चुका केल्या. या चुका सुधारण्याची गरज पाकिस्तानच्या संघाला असल्याचे अक्रम म्हणाला. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानने या संपूर्ण स्पर्धेत एकूण १४ कॅचेस सोडले आहेत.