महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

''मिशी ठेऊ का?'', अक्रमच्या प्रश्नाला आफ्रिदीचे 'झकास' उत्तर - wasim akram latest news

त्याच्या या ट्विटवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने उत्तर दिले आहे. ''मिश्या असो वा नसो तुम्ही नेहमीच स्टार असाल'', असे आफ्रिदीने अक्रमला म्हटले.

Wasim Akram asked-Should I have a mustache or not
''मिशी ठेऊ का?'', अक्रमच्या प्रश्नाला आफ्रिदीचे 'झकास' उत्तर

By

Published : Apr 13, 2020, 9:07 PM IST

कराची - पाकिस्तानचा दिग्गज माजी गोलंदाज वसिम अक्रमने चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. मी मिशी ठेवावी का? असा प्रश्न त्याने चाहत्यांना विचारला आहे. या प्रश्नासह त्याने दोन फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोत तो मिशीशिवाय आणि दुसऱ्या फोटोत ते मिशीसह दिसत आहे.

त्याच्या या ट्विटवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने उत्तर दिले आहे. ''मिश्या असो वा नसो तुम्ही नेहमीच स्टार असाल'', असे आफ्रिदीने अक्रमला म्हटले.

पाकिस्तानात खूप गुणवत्ता असून हा देश क्रिकेटचा ब्राझील आहे, असे मत वसीम अक्रमने काही दिवसांपूर्वी मांडले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डीन जोन्ससोबत यू-ट्यूब वाहिनीवर झालेल्या चर्चेत अक्रमने ही प्रतिक्रिया दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details