नवी दिल्ली -प्रतिष्ठित अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-१ अशी आघाडी मिळवली असली तरी स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यापाठी लागलेला टीकेचा ससेमिरा काही संपलेला नाही. चेंडूत फेरफार करण्याच्या प्रकरणाविषयी इंग्लंडचा गोलंदाज स्टीव हार्मिसनने स्मिथबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यानंतर आता इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने डेव्हिड वॉर्नरबद्दल एक खुलासा केला आहे.
हेही वाचा -'स्मिथने कितीही चांगले प्रदर्शन केले तरी तो चीटर म्हणूनच ओळखला जाईल'
एका वृत्तपत्राला कुकने मुलाखत दिली. त्यामध्ये कुक म्हणाला, 'चेंडूत फेरफार करण्यासाठी वॉर्नर हाताला चिकटपट्टी लावत होता. बीयर पिल्यानंतर वॉर्नरने सांगितले होते की प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तो असे करत असे. त्या चिकटपट्टीवर वॉर्नर असा पदार्थ लावायचा जेणेकरुन चेंडूत बदल होईल.'