महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणे वॉर्नरला नापसंत - david warner on cricket without an audience news

वॉर्नर म्हणाला, “या क्षणी इंग्लंडमध्ये जे घडले त्यानंतर तिथे जाण्याची मला फारशी शक्यता वाटत नाही.” इंग्लंडमधील व्यावसायिक क्रिकेट १ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले असून वेस्ट इंडीजसमवेत जूनमधील दोन कसोटी सामन्यांची मालिकाही पुढे ढकलण्यात आली आहे.

Warner is not in favor of starting cricket without an audience
रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणे वॉर्नरला नापसंत

By

Published : Apr 29, 2020, 5:31 PM IST

मेलबर्न - कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंड आणि स्कॉटलंड दौर्‍यावर जाणे शक्य नसल्याचे मत सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केले आहे. २९ जून रोजी ऑस्ट्रेलियाला स्कॉटलंडबरोबर टी -२० सामना, तर इंग्लंडमध्ये तीन टी -२० आणि समान एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.

वॉर्नर म्हणाला, “या क्षणी इंग्लंडमध्ये जे घडले त्यानंतर तिथे जाण्याची मला फारशी शक्यता वाटत नाही.” इंग्लंडमधील व्यावसायिक क्रिकेट १ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले असून वेस्ट इंडीजसमवेत जूनमधील दोन कसोटी सामन्यांची मालिकाही पुढे ढकलण्यात आली आहे.

रिक्त स्टेडियममध्ये खेळण्याची कल्पनाही वॉर्नरने नाकारली आहे. तो म्हणाला, “यात काही शंका नाही की तुम्ही जेथे जाल तेथे प्रेक्षकांना पाहायचे आहे. मला इंग्लंडमध्ये खेळायला आवडते. आम्हाला आशा आहे की चांगले प्रदर्शन करून लोकांचे आम्ही मनोरंजन करू शकतो.”

ABOUT THE AUTHOR

...view details